AVANI MAKA TEL 1

दीर्घ आणि विशाल जीवनाचा मंत्र देणारी – वटपौर्णिमा….

येत्या १० जूनला वटपौर्णिमा येत आहे. नेहमीप्रमाणे हिंदू सणाला नावं ठेवणारे, हे कसले थोतांड! असं म्हणतीलच. कोण सत्यवान ? कोण सावित्री ? असेही प्रश्न उपस्थित करतील.

     यातून एक मात्र होते की याच हिंदू सणांमुळे पर्यावरण सांभाळले पाहिजे हा संदेश मात्र नक्की मिळतो आणि तेच आपण विसरलोय. सत्यवान, सावित्री हेच फक्त लक्षात राहतात पण, जे झाड सावित्रीने निवडले तो वडच का? दुसऱ्या हजारो झाडांच्या जाती असताना, वटवृक्षाची निवड का? हा विचार मनात यायला हवा.  

  वटवृक्षाच्या प्रत्येक घटकांचा औषधी उपयोग आहे. अगदी पूर्ण वृक्षाचा विचार करा, त्याचा बुंधा आणि फांद्या इतक्या विशाल आहेत की त्या इतक्या कडक उन्हात पूर्ण सावली आणि मुसळधार पावसात भिजण्यापासून संरक्षण करतात. मुळात वनस्पतीतील उत्क्रांती वडाचा झाडाच्या ठिकाणी पूर्ण झाली असे म्हणतात.

  वडाचे झाड हे आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये फार महत्त्वाचे मानतातच.  झाडातील नवांकुरा चा रस अथवा छोट्या फळांचा रस नाकात टाकल्यास वीर्य वाढणे अथवा Sperm Count सुधारण्यासाठी फारच प्रभावशाली असतो.

  वडाच्या पारंब्याच्या तेलाने तर स्त्रियांचे केस वाढतात, तजेलदार होतातच शिवाय कोंडा, चाई होणे या गोष्टींना आळा बसतो.  स्त्रियांनी तर वडाच्या झाडाला जरूर प्रदक्षिणा घालाव्यात कारण त्याचा हार्मोनल इम्बॅलन्स सुधारण्यासाठी उपयोग होतो.  म्हणजे वडाचे झाड हे ऑक्सिजन खूप प्रमाणात बाहेर टाकते, त्यामुळे शरीरातील ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्स रक्तात रिलीज करतात.

 वडाच्या झाडाची साल दंतमंजनात वापरली जाते कारण ती उत्तम अँटीबॅक्टरियल आहेच शिवाय हिरड्या मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. खरंतर वडाचे झाड पूर्वी लावावे लागत नसे, ते कोठेही बांधावर येते, असे सहज येणारे झाड आहे आणि ते इतके वाढते की येणाऱ्या जाणाऱ्याला असे वाटते की वडाचे झाड आपल्याला जणू आश्वस्त करते की “घाबरू नका मी आहे”

 या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयुरब्रिज बोटॅनिकल्स सर्व विशाल वटवृक्षांना नमस्कार करून आपणास विनंती करू इच्छिते की  अवनी ब्रँडची उत्पादने जसे की अवनी माका तेल आणि पेनोसील मलम नक्की वापरून पहा.  

धन्यवाद…

अनुजा कुलकर्णी

संचालक,

आयुरब्रिज बोटॅनिकल्स ओपीसी प्रा. लि.

मिरज

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *