ChatGPT Image Dec 20, 2025, 07_16_44 PM

प्राजक्ताचे झाड तोडताना……

कधी नव्हे ते यावर्षी कडक हिवाळा सुरू झाला आणि त्याबरोबरच पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरच्या अखेरपासून बरीचशी पानगळ सुरू झाली. माझ्या घरात चार वर्षांपासून लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाची पाने अगणित भराभरा पडू लागली आणि खूप कचरा दिसू लागला. खरंतर प्राजक्त मीच हौसेने लावला. मला खूप आवडतो कारण त्याचा मंद वास आणि रंग वेगळीच निसर्गाची किमया! दुधीरंग धड पांढरा पण नाही नाजूक वेगळ्या आकाराच्या पाकळ्या आणि देठ नारंगी रंगाचे. असे म्हणतात की प्राजक्ताने सूर्यावर प्रेम केले आणि त्यामुळे सूर्योदयानंतर सगळी फुले झाडावरून खाली पडतात, अनुरक्त होऊन अशी त्यामागे वेगळीच कवी कल्पना. याशिवाय कृष्णाने सांगितले झाडामध्ये प्राजक्तात मी आहे, हा एक वेगळा संदर्भ. सुरुवातीच्या काही दिवसात झाड वाढले तरी फुले येईनात. पहिलं फुल जेव्हा आलं तेव्हा मी अक्षरश: वेडी झाले होते. त्यानंतर पावसाळ्यात मात्र पडून सगळी फुलं निर्माल्य होत होती. या झाडामुळे पक्षी खूप यायला लागले. बुलबुलने तर घरटं बांधलं, दोन पिल्लांना जन्म दिला आणि ह्याच झाडावर राहून त्यांना सक्षम केलं. खूप कचरा व्हायला लागल्यानंतर आमच्या माळ्याने “फांद्या तोडा, पुन्हा लगेच येतात, बहर ओसरलाय!” असं सांगितलं आणि त्यांनी फांद्या तोडल्याच. सर्व आकाश खुलं झालं त्याबरोबर मनात काहूर माजलं. या एका झाडाने सर्वांनाच किती ऊब आणि सुरक्षितता दिली होती; माझ्यापासून ते प्राणी पक्ष्यांपर्यंत.

 पारिजातकाचे आयुर्वेदात तर खूप उपयोग आहेत. अगदी मुळापासून फुलांपर्यंत. धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि औषधी असे तिहेरी उपयोग सांगितले आहेत. याचे खोड ताप, खोकला आणि सांधेदुखी यावर वापरतात. मूळ त्वचेच्या विकारांवर उगाळून लावतात. पाने फुले वेदनाशामक आणि दाह विरोधी आहेत. हे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात येते.

   धार्मिकदृष्ट्या याला कल्पवृक्ष मानले आहे. यामुळे वास्तुदोष दूर होतात. परत पाने फुले येण्यासाठी खरंतर फांद्या तोडल्या; पण जणू काही मलाच काहीतरी होत असल्यासारखी अस्वस्थता आली. पण म्हणतात ना समृद्धी मिळवण्यासाठी काही वर्षे मातीत घालवावी लागतात, त्याप्रमाणेच पुढचा बहर चांगला येण्यासाठी प्राजक्ताच्या फांद्या मला तोडाव्या लागल्या. उम्मीद पे दुनिया कायम है. प्राजक्ताच्या निमित्ताने एका झाडाच्या आणि त्याबरोबरच  निसर्गाने मानवाला दिलेला फायदा परत एकदा उजळणी करून झाला.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो, त्यापैकीच एक म्हणजे औषधी वनस्पती. अनेक वनस्पतींच्या विविध भागात औषधी गुणधर्म असतात. त्यांचाच उपयोग करुन आम्ही आयुर्ब्रीझ बोटानिकल्सच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या खजिन्यातून अनेक परिणामकारक औषधे तयार केली आहेत. हिवाळ्यात वर्षभराच्या शक्तीचा संचय करण्यासाठी – च्यवनप्राश – सर्दी, ताप, खोकला यासाठी – अवनी अडुळसा कफ सिरप – तळहात, तळपाय येथील भेगा, त्वचा कोरडी पडून खाज येणे यासाठी – पाददारी मलम – अशी अनेक दर्जेदार उत्पादने आपण सर्व वापरत आहातच. आपल्या सर्वांचे सहकार्याबद्दल धन्यवाद!!!

नवीन इंग्रजी वर्ष 2026 साठी आरोग्यमय शुभेच्छा !!!

धन्यवाद.

अनुजा कुलकर्णी, संचालक, आयुर्ब्रीझ बोटानिकल्स

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *